पुणे हादरले | गोळीबाराचा थरार CCTVमध्ये कैद | Firing CCTV Video Virual | Wanwadi | Pune News

Lokmat 2021-09-13

Views 55

काही दिवसांपूर्वीच पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ भरदिवसा गोळ्या घालून बिल्डरची हत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आणि पुन्हा एकदा भरदिवसा गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एका व्यवसायिक जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ माजली आहे.मयुर हांडे (वय 32) असे या गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. वानवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार जखमी मयुर हांडे हे वाळू व्यावसायिक आहेत. बांधकामासाठी लागणारी वाळू पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. आज दुपारच्या सुमारास ते वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीराम चौकातून जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये जखमी झाल्याने त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे

#lokmat #Firinginpune #wanwadi #CCTVVideoViral
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS