अभिनेते शरद पोंक्षे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर हजेरी लावल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. गांधी हत्येचं समर्थन करणारी व्यक्ती राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर कशी .. असा प्रश्न विचारला जात होता. पण जेव्हां आम्ही या प्रकरणाच्या अधिक खोलात गेलो, तेव्हा आमच्या हाती अनपेक्षितपणे अत्यंत ईंटरेस्टींग माहिती लागली. ही बातमी ऐकल्यावर तुम्हाला शरद पोंक्षे प्रकरणात कोणताही ईंटरेस्ट राहणार नाही. शरद पोंक्षे हे मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह आहेत तर अध्यक्ष आहेत प्रसाद कांबळी. प्रसाद कांबळी हे ज्येष्ठ नाट्य कलावंत दिवंगत मच्छिंद्र कांबळी यांचे चिरंजीव. भरपूर शिकलेले. तर शरद पवार आहेत नाट्य परिषदेचे आजीवन विश्वस्त ... आता यात शरद पवारांचा संबंध काय ? तर शरद पवार यांच्या सांगण्यावरून १९९१ साली मच्छिंद्र कांबळी यांनी मधू दंडवते यांच्या विरोधात रत्नागिरीतून लोकसभा निवडणूक लढवली होती. फक्त पवार यांच्या सांगण्यावरून ... तेव्हांपासून शरद पवार यांचे कांबळी कुटुंबियांसोबत संबंध आहेत. ज्यावेळी प्रसाद कांबळी यांनी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची तयारी केली तेव्हा त्यांना पवार गटानी मदत केली होती. आणि म्हणूनच प्रसाद कांबळी यांना मोहन जोशी सारख्या ज्येष्ठ कलावंताचा पराभव करता आला होता. आता हे राजकारण का सांगत आहोत आणि याचा आजच्या परिस्थितीशी काय संबंध आहे ते जाणून घेऊ
#lokmat #AadeshBandekar #PrasadKambli #SharadPonkshe #NCP #Shivsena
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat