सुशांतची ५० अपूर्ण स्वप्न ‘ती’ करणार पूर्ण | Sanjana Sanghi | Sushant Singh Rajput's 50 Dreams

Lokmat 2021-09-13

Views 1

छोट्या पडद्यावर पवित्र रिश्ता, तर रुपेरी पडद्यावर काइ पो चे या चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाचं खणखणीत नाणं वाजवणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी आत्महत्या केली. वयाच्या ३४ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या या अभिनेत्याने उराशी अनेक स्वप्नं बाळगली होती. सुशांतने ५० स्वप्नांची यादी तयार केली होती आणि ते सारं त्याला करुन पाहायचं होतं. . मात्र त्याची स्वप्न अर्ध्यावरच राहिली. परंतु सुशांतची ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक अभिनेत्री आणि त्याची मैत्रीण पुढे सरसावली आहे. सुशांतची अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार तिने केला आहे.सुशांतच्या आगामी ‘दिल बेचारा’ या चित्रपटात त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री संजना सांघी हिने सुशांतची स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने सुशांतसोबतचे काही फोटोही शेअर केले आहेत.वेळेबरोबर जखमाही भरुन निघतात,असं ज्याने म्हटलं आहे ते चूक आहे. उलट त्या जखमा प्रत्येकवेळी पुन्हा उघड्या पडतात. आयुष्यात कायम लक्षात राहतील असे प्रत्येक क्षण रक्ताप्रमाणे पुन्हा वाहू लागतात. आता पुन्हा एकत्र खळखळून हसता येणार नाही, काही प्रश्न अनुत्तरीतच आहेत. पण हे दु:ख पचवण्यासाठी आपला चित्रपट काय तो उपाय आहे. निदान तेच काय या क्षणी सगळ्यांसाठी भेटवस्तू आहे”, असं संजना म्हणाली.पुढे ती म्हणते, “मी तुला वचन देते, तुझी अपूर्ण राहिलेली स्वप्न पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. जी तुझी इच्छा होती, ती मी पूर्ण करेन. मात्र तू वचन दिलं होतंस की ही स्वप्न आपण एकत्र पूर्ण करु. परंतु आता तुझ्याशिवाय मला ही स्वप्न पूर्ण करायची आहेत”.
काय होती सुशांतची ड्रीमलिस्ट त्यावर एक नजर टाकूया , पहा सविस्तर विडिओ -

#lokmat #sushantsinghrajput #SanjanaSanghi #Lokmatcnxfilmy
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS