पुण्यातल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये हाणामारी | Jumbo Covid Centre Pune | Pune News

Lokmat 2021-09-13

Views 2

वादविवाद आणि पुण्यातले जम्बो कोविड सेंटर हे समीकरण अजुनही संपायला तयार नाही. पहिल्यांदा रुग्णांची हेळसांड, रुग्ण गायब होणे इथपासून ते नर्स आणि आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचे पगार थकवणे इथपर्यंतचा या सेंटरचा प्रवास आहे. मध्यंतरी इथून एका महिला पेशंट झाल्याची घटनाही घडली होती. या सेंटरमध्ये जिवाची पर्वा न करता कोविड रुग्णांची सेवा करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना पगार न मिळाल्यामुळे इआतापर्यंत दोन-तीन वेळा आंदोलनही झाले आहे. अखेर आज सेंटरच्या आवारात कर्मचाऱ्यांचा थकीत पगार देण्यात येत होता. मात्र त्यातच बाउंसर आणि कर्मचारी यांच्यामध्ये वादाला सुरुवात झाली. हा वाद इथपर्यंत वाढला की अक्षरशः एकमेकांच्या अंगावर धावून जाणं आणि मारामारी असे प्रकार सुद्धा बघायला मिळाले. कोविड सेंटरमध्ये जर असे असुरक्षित वातावरण असेल तर नागरिकांना तिथे येणे कसे भरवशाचे वाटेल।हा सवाल आहे. दरम्यान इथे झालेल्या हाणामारीचा व्हिडिओ आता समोर घटनेचे गांभीर्य दर्शवणारा आहे.

#lokmat #Punenews #JumboCovidCentre #Covidcentre
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS