अर्णब गोस्वामी यांनी आणखी एक याचिका दाखल केलीय. आता ही याचिका अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाशी संबंधीत नसून टीआरपी स्कॅमशी संबंधीत आहे. मुंबई पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी हा अनोखा स्कॅम उघड केला होता. ज्या घरातल्या टीव्हीला बार-ओ-मीटर लावली होती, त्या घरातल्या सदस्यांना ठराविक चॅनल लावून ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी केला होता. यात मराठी चॅनल फक्त मराठी, रिपब्लीक टीव्ही आणि अन्य एका टीव्ही चॅनलचं नाव आलं होतं. या प्रकरणी पोलीसांनी आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. यात रिपब्लीक चॅनलचे सहाय्यक उपाध्यक्ष घनश्याम सिंग यांचाही समावेश होता. त्यांना २६ दिवस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना धमकावलं, पिठाच्या गिरणीत वापरतात तशा पट्ट्यानी मारलं असा आरोप करत अर्णब गोस्वामी यांच्या वकिलांच्या पथकानी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून या तपासकामी होत असलेल्या छळवणूकीला आळा घालण्याची विनंती केलीय.
#lokmat #Maharashtrapolice #Arnabgoswamicase #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat