हिंदूहृदयसम्राट Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarg बोगदा कसा आहे ? Igatpuri to Thane Tunnel

Lokmat 2021-09-19

Views 1

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातून जात असलेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचं काम वेगात सुरू आहे. या कामांतर्गत नांदगावसदो ते वाशाळापर्यंत ८ किलोमीटर लांब दुहेरी बोगद्याचं काम विक्रमी वेळेत पूर्ण झालंय. त्यामुळे हा बोगदा देशातला सर्वात रुंद आणि चौथ्या क्रमांकाचा ठरलाय. मुंबईला जाण्यासाठी आणि येण्यासाठी दोन स्वतंत्र बोगदे तयार करण्यात आलेत. इगतपुरीजवळचा कसारा घाट भेदून हे बोगदे तयार करण्यात आलेत. दोन्ही बोगद्यांची लांबी ८ किलोमीटर आणि रुंदी साडेसतरा मीटर आहे. १५०० कामगार आणि दीडशे इंजिनीअर्सच्या टीमने बोगद्याच्या कामाचं आव्हान पेललंय. हा ८ किलोमीटरचा दुहेरी बोगदा अवघ्या २ वर्षात पूर्ण झाला. देशात प्रथमच एवढ्या वेगाने बोगद्याचं काम झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलीय.
KIRAN Anchor
#SamruddhiMahamarg #IgatpuritoThane #Nashik #BalasahebThackeray

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS