सब टीव्हीच्या 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या सिरीयलच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये गोकुळधामचे सदस्य मातृभाषेवरून एकमेकांशी वाद घालताना दिसले. हा राडा क्षमविण्यासाठी बापूजी चंपक लाल यांनी मध्यस्थी करून गोकुलधाममध्ये सुरू असलेला राडा थांबवला. मालिकेतला हा राडा थांबला पण तो थांबविण्यासाठी जे शब्द वापरण्यात आले, त्यावरून आता बाहेर संतप्त भावना व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मालिकेच्या या एपिसोडबाबत तीव्र संताप व्यक्त केला. आता मनसेने निषेध नोंदविल्यावर सिरीयलचा निर्माता आणि चंपकलालची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने माफी मागितली आहे. मुंबईची सामन्यांची भाषा कोणती आहे, तर ती हिंदी आहे. असे वादग्रस्त संवाद या सिरीयलमध्ये चित्रित करण्यात आले होते. यावर मनसेने तीव्र आक्षेप घेतला आणि सोशल मीडियावर आणि विविध स्तरावर आपला निषेध व्यक्त केला. त्यानंतर सिरीयलच्या निर्माते आणि कलाकार वढणीवर आले. त्यांनी राज ठाकरे यांना मराठीत पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली आणि माफी मागितलीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या सर्व प्रकरणी 'तारक मेहता....'चा तीव्र शब्दांत विरोध करण्यात आला. मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी असणाऱ्या अमेय खोपकर यांनी 'हेच ते मराठीचे मारक मेहता', असं लिहित एका ट्विटर पोस्टमधून संताप व्यक्त केला.मनसेने आक्षेप नोंदवल्यानंतर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'चे निर्माते असित कुमार मोदी यांनी ट्विटरद्वारे स्पष्टीकरण आहे. आता असित कुमार मोदी यांच्यानंतर या मालिकेत चंपक चाचाच्या भूमिकेत असलेल्या अमित भटने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून लेखी माफी मागितली आहे. त्याने माफीनाम्यात लिहिले आहे की, मी अमित भट तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत काम करतो. सदर मालिकेत मी चंपक चाचा ही भूमिका साकारतो. या मालिकेत काम करत असताना लेखकाने दिलेले संवाद बोलताना मुंबई येथील भाषा हिंदी आहे असे माझ्याकडून चुकून बोलले गेले आहे. कारण स्क्रिप्टमध्ये तसे शब्दे होते. तरीदेखील मुंबई येथील भाषा हिंदी नसून मराठी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. सदर झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी पण मागतो. यापु?