पैसा पुणेकरांचा आहे, भाजपच्या बापाचा नाही | MNS Rupali Patil | Corona Virus In Pune

Lokmat 2021-09-13

Views 62

पुण्यातील कोविड रुग्णांसाठी उभारण्यात येणाऱ्या जम्बो रूग्णालयाला निधी देण्यास पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी असमर्थतता दर्शविल्यानंतर मनसेने त्यांचा निषेध करणारे आंदोलन केले. महापालिकेत स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या या दालनात हे आंदोलन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की पुण्यामधील कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . त्यामुळे शहरातील आरोग्य सुविधा अपुऱ्या पडायला लागल्या. त्यातच प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या आढाव्यात येत्या काही दिवसात ही संख्या अजून वेगाने वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे तीन जम्बो रुग्णालय उभारली जाणार आहे. त्याकरिता सुमारे तीनशे कोटी रुपये खर्च येणार असून त्यातील 50 टक्के रक्कम राज्य सरकार, 25 टक्के रक्कम पुणे महापालिका आणि 12.5 टक्के रक्कम पिंपरी-चिंचवड महापालिका आणि 12.5 टक्के रक्कम पी एम आर डी ए देणार आहे. मात्र पुणे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष असलेले रासने यांनी निधी देण्यास असमर्थता दर्शवली, त्यावरून मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा पैसा त्यांच्या घरचा नसून पुणेकरांचा आहे आणि त्यांना आरोग्य सुविधा मिळायलाच हव्यात अशी भूमिका मनसेने मांडली आहे.

#lokmat #Punenews #Coronavirus #Covid19 #MNSRupaliPatil
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS