राज्यात लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढला. ठाण्यात तर पुन्हा संचारबंदी सारखी परिस्थिती जाहीर केलीय. ठाण्यात १ जुलैच्या मध्यरात्रीपासून ११ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन जाहीर झालाय. फक्त मेडीकल दुकानं, दुग्धजन्य पदार्थ विकणारी दुकानं आणि हॉस्पीटल्स उघडी राहणार आहेत
उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हे विधान केलं होतं त्यानंतर आज राज्यात लोक डाऊन 31 जुलै पर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
सध्या लागू असणारा लोकडाऊन हा 30 जून रोजी संपणार होता, मात्र राज्यातील कोरोना व्हायरस रुग्णांची वाढते आकडे पाहता पुढील संपूर्ण महिन्यासाठी पुन्हा एकदा लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, यानुसार 1 ते 31 जुलै या दरम्यान राज्यात लॉक डाऊन असणार आहे.
*लॉकडाऊन का वाढवला*
यासाठी २ गोष्टी कारणीभूत आहेत पहिली राज्यात दिवसेंदिवस रुग्णांची वाढती संख्या. आणि दुसरा म्हणजे नागरिक संचारबंदीचं पालन करत नसल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आलाय. आज संपूर्ण मुंबईत लॉकडाऊन चा फज्जा उडाला होता. सगळीकडे वाहनांची गर्दी , लांबच लांब रांगा होत्या. अत्यावश्यक काम नसतांना देखील नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. त्यामुळेच लॉकडाऊन पुन्हा एकदा वाढवण्यात आलाय.