महाराष्ट्राची मान आज लाजेनी झुकली. अकोल्यातला एक प्रकार राज्यच शिक्षण खातं आणि जिल्हा प्रशासन किती खालच्या पातळीवर जाऊ शकतं याचं जिवंत उदाहरण अकोला जिल्ह्यातल्या मुर्तिजापूर इथं पाहायला मिळालं. 9 प्राध्यापकांची ड्युटी थेट दारूच्या दुकानांवर लावण्यात आली. कशासाठी? तर दारुडे शारीरिक अंतर पळत आहेत की नाही, दुकानदारांनी मार्किंग केलाय कि नाही, दारू दुकानदार नियम पळत आहेत की नाही, हे पाहण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. हे सगळे प्राध्यापक संत गाडगेबाबा महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत. ज्या गाडगेबाबांनी स्वछता आणि व्यसनमुक्तीसाठी आपलं जीवन खर्ची घातला, त्यांच्याच नावानी स्थापन झालेल्या या कॉलेजच्या प्राध्यापकांवर हि नामुष्की ओढवली आहे.
k ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat