Ravi Shankar Prasad | Rahul Gandhi Should Apologise | Rafale Deal | New Delhi

Lokmat 2021-09-13

Views 0

राफेल डील प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला दुसऱ्यांदा क्लीन चिट मिळाल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राफेल विरोधातील पुनर्विचार याचिकेवर गुरुवारी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. यावेळी राफेल विरोधातील सर्व याचिका कोर्टाने फेटाळल्या असून चौकशीची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून भाजपाने सत्याचा विजय झाल्याचे सांगत काँग्रेसवर निशाणा साधला आहे.भाजपाचे वरिष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी राफेल विरोधात जाणून-बुजून कट रचल्याचा आरोप रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसवर केला. राहुल गांधी यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. कारण, त्यांनी खोटे सांगितले होते की, फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी पंतप्रधानांना चोर म्हटले आहे. मात्र, याबाबत राष्ट्रपतीनींच खंडन केले आहे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. तसेच, डिफेंस कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्र‌ॅक्ट घेण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. जे लोक कॉन्ट्रॅक्टमध्ये यशस्वी झाले नाहीत. त्यांनी राफेलला सुद्धा उशिर करण्यास प्रयत्न केले होते, असे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #newdelhi #RaviShankarPrasad #RahulGandhi

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS