पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील एका तरुणाने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून मालकाच्या २२ लाखांच्या क्रेटा, इनोव्हा या गाड्या पेटवून दिल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या भावाने त्याला यासाठी मदत केली होती. याप्रकरणी ६० वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.