अक्षय्य तृतीयेला कोल्हापूरच्या अंबाबाईची झोपाळ्यातील पूजा

Lokmat 2021-09-13

Views 2

कोल्हापूर - वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेचा उत्साह मुहूर्ताच्या खरेदीने द्विगुणित करीत कोल्हापूरकरांनी  सणाचा आनंद लुटला. सोने-चांदीसह अलंकारांची खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दारात नवी कोरी दुचाकी, चारचाकी यांसह विविध वस्तू व साहित्याच्या खरेदी-विक्रीने बाजारपेठेला उभारी मिळाली. दुसरीकडे कोल्हापूरच्या श्री अंबाबाईची  झोपाळ्यातील आकर्षक पूजा बांधण्यात आली. घरोघरी पुरणपोळीसारख्या पक्वान्नांचा घमघमाट होता.नववर्षातील गुढीपाडव्यानंतर आलेली अक्षय्यतृतीया म्हणजे कुटुंबातील सुख, समृद्धी, भरभराटीचा कधीही क्षय न होवो, अशी कामना करणारा दिवस. यानिमित्त करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची गरुडमंडपात झोपाळ्यातील पूजा बांधण्यात आली. वर्षातून एकदा देवीची ही पूजा बांधली जाते.

Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS