पुणे - समाजवादावर अविचल निष्ठा असणारा, शेवटच्या क्षणापर्यंत जपणारा नेता गेल्याने महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक चळवळीचं कधीही न भरून येणारं नुकसान झालं आहे.शेवटपर्यंत धीर देणारा, कामगार, शेतकरी, उपेक्षित, वंचित यांचा दबलेला आवाज त्याठिकाणी अग्रेसरपणे संघर्ष करून संकटांशी सामना करणारा, सदैव आयुष्यभर गरिबांच्या बाजूने उभा राहणारा असा एक तात्विक केवळ समाजवादी नाही तर आचरण करणारा कार्यकर्ता आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सोडून गेला आहे. गरीबातल्या गरिबासाठी काम करत राहणे हिच त्यांना श्रद्धांजली ठरेल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews