माधुरी दीक्षितला बॉलिवूडची धकधक गर्ल म्हटले जाते. तिने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आता ती प्रेक्षकांना एका मराठी चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तिच्या या मराठी चित्रपटाचे नाव बकेट लिस्ट असून या चित्रपटात सुमीत राघवन तिच्या नायकाची भूमिका साकारत आहे. माधुरीच्या बकेट लिस्ट या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण संपल्यानंतर तिने तिच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली घोषणा केली आहे. माधुरी आता प्रेक्षकांना निर्मातीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार असून हा एक कॉमेडी चित्रपट आहे. स्वातंत्र्य हे एक असे गिफ्ट आहे जे केवळ तुम्ही स्वतःला देऊ शकता या विषयावर हा चित्रपट असणार असून मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.माधुरी दीक्षितची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे नाव १५ ऑगस्ट असून या चित्रपटात राहुल पेठे आणि मृण्मयी देशपांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews