Lokmat News | नववधू घरात येताच प्रसूती कळा | दिला बाळाला जन्म | New Bride

Lokmat 2021-09-13

Views 0

ह्या जगात कधी काय होईल काही सांगता येणार नाही उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे. इथे एका गावात लग्नानंतर घरी आलेल्या नववधूची अचानक तब्येत बिघडली.नववधूच्या स्वागतासाठी आरतीचं ताट घेऊन उभ्या असलेल्या महिलांना हे समजाला जराही वेळ लागला नाही की, नवरीला प्रसुती कळा येताहेत. महिलांनी आरतीचं ताट बाजूला ठेवून नववधूची प्रसूती केली. या घटनेने नवरदेवाच्या घरच्यांना चांगलाच धक्का बसलाय.  घडलेल्या प्रकारानंतर नववधूला घरातच घेतलं नाही. सध्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होतीये. या घटनेमुळे संतापलेल्या नवरदेवाने पोलिसात जाऊन मुलीच्या आई-वडिलांविरोधात तक्रार दिली आणि मुलीला घरी परत जाण्यास सांगितले आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS