रितेशने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून नीरव मोदीला वेगळ्या अंदाजात टोला लगावला आहे.रितेशने फोटो पोस्ट करत ट्विट केले आहे. त्यात त्याने म्हटले आहे, 'कदाचित मी एकटाच बँक चोर आहे, जो अयशस्वी ठरला.' रितेशच्या या ट्विटनंतर हजारो सोशल मीडिया युजर्सनी लाईक आणि रिट्विट केले आहे. यावर कॉमेंट्सचा पाऊस देखील पडत आहे. या ट्विटमुळे काहींनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत तर काहींनी यावर सरकारला गंभीरपणे विचार करण्याचा सल्ला दिला आहे. खरंतरं रितेशचा 'बँक चोर' हा चित्रपट आला होता. यात रितेशसोबत विवेक ओबेरॉय दिसला होता. पण, 'बँक चोर'ची बॉक्स ऑफिसवर जादू चालली नाही.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews