अभिनेत्री अमिषा पटेल नेहमीच तिच्या फोटोज् आणि व्हिडीओजमुळे चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांसाठी सातत्याने सोशल अकाउंटवर फोटो शेअर करीत असते. बºयाचदा तर तिने तिचे असे काही हॉट फोटोज् शेअर केले ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा तिने काहीसे असेच फोटो शेअर केले असून, त्यास तुफान लाइक्स आणि कॉमेण्ट्स मिळत आहेत. परंतु काही यूजर्स नेहमीप्रमाणे तिच्या फोटोवर टीकाही करीत आहेत. अनेकांनी तर अतिशय गलिच्छ अशा स्वरूपाच्या कॉमेण्ट्स केल्या आहेत. अमिषाने काही दिवसांपूर्वीच हॉट बिकिनी फोटोशूट केले. त्यातील काही फोटोज् तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. या फोटोमध्ये अमिषाने खूपच रिव्हिलिंग ड्रेस घातला आहे. त्यामुळे या फोटोमुळे ती पुन्हा एकदा ट्रोल होत आहे. यूजर्स अतिशय गलिच्छ अशा स्वरूपाच्या कॉमेण्ट्स देत आहेत. परंतु यूजर्सच्या या कॉमेण्ट्स बघितल्यानंतर आता अमिषाचाही पारा होताना दिसत आहे. त्यामुळे पहिल्यांदाच तिने यूजर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews