Lokmat News | मुख्यमंत्र्यांचा दावा 3 वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न तिप्पट झाले | Devendra Fadnavis

Lokmat 2021-09-13

Views 2

राज्य शासन बळीराजाच्या उत्थानासाठी विविध योजनांच्या माध्यमातून कार्य करीत आहे. उन्नत शेती व समृद्ध शेतकरी करण्यासाठी शासन अभियान राबविण्यात येत आहे. कर्जमाफी, गटशेती, ठिबक सिंचन, थेट लाभ हस्तांतरण, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे अशा अनेक योजना राज्य शासनाने अमलात आणल्या आहेत. शासन करीत असलेल्या प्रयत्नामुळे शेतक-यांचे उत्पन्न तिप्पट वाढले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.खामगांव येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या मैदानावर बुलडाणा जिल्हा कृषि महोत्सव २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान व आधुनिकीकरण उपयोगात आणणारे शेतकरी राज्यात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये उपयोग करणा-या शेतक-यांसोबतच पारंपरिक पद्धतीने शेती करणारा मोठा वर्ग राज्यात आहे. या वर्गाला आधुनिक शेतीचे धडे गिरविण्यासाठी व शेती समृद्धीची करण्यासाठी कृषि महोत्सव पर्वणी ठरणार आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS