''मुंबईतील वाढत्या ट्राफिकवर उपाययोजना करताना प्रशासनाने पुढील १० वर्षांनंतर येणाऱ्या परिस्थिती नुसार आत्ता पासूनच उपाययोजना करण्याची गरज असल्याचंही कोर्टाने सांगितलं. 'ट्राफिक मुळे मुंबईसारख्या ठिकाणी लोकं छोटं अंतर हे पायीच कापण पसंत करतात. त्यामुळे सब वे, फूट ओव्हर ब्रिज, स्कायवॉक यांसारख्या सुविधा जास्तीत जास्त निर्माण करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल, ''ट्राफिकचे नियम मोडणाऱ्यांवर आधुनिक तंत्रज्ञान वापरून कारवाई करा, जेणेकरून वाहन चालकांमध्ये कायद्याचा धाक राहिल. शिवाय दिल्लीच्या धर्तीवर ठराविक दिवशी ऑड इव्हेन नियम करण्यास काय हरकत आहे? पार्किंग च्या वाढत्या समस्येवर उपाय म्हणून भुयारी पार्किंगचा सकारात्मक विचार करायला हवा, जेणेकरून जागेची समस्या उद्भवणार नाही. असंही हायकोर्टाने म्हटलं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews