Lokmat News | पुण्यात व्हॉट्सअॅपने घेतला १७ वर्षांच्या मुलाचा बळी | Whatsapp | Crime News | Lokmat

Lokmat 2021-09-13

Views 63

संग्रामदुर्गजवळ एका शाळकरी मुलाची हत्या झाल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती.मुलाचे नाव अनिकेत शिंदे आहे.अनिकेत आणि त्याच्या मित्रांनी काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपचा एक ग्रुप सुरु केला. पण कालांतराने याच ग्रुपमधल्या सदस्यांचे मतभेद सुरु झाले. एकमेकांना हिणवण्यासाठी आपले स्टेटस बदलण्याचा दिनक्रम सुरु झाला एकाने ‘द किंग’ असा स्वतःचा स्टेटस ठेवला. तर त्याला शह देण्यासाठी दुसऱ्याने ‘आपणच बादशाह’ असा स्टेटस ठेवला. याच वादातून ग्रुपमधल्या एका सदस्याने अनिकेतला कुत्रा असे संबोधले आणि वाद विकोपाला गेला.याच वादातून चाकणच्या भुईकोट किल्ल्यात आमना-सामना करायचं ठरलं आणि तिथेच झटापट सुरु झाली. यातच एकाने अनिकेतला भोसकलं. त्यात अनिकेतचा मृत्यू झाला झाला तर त्याच्यासोबत असलेल्या ओंकार हा देखील गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून आणखी पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS