Lokmat Politics | मोदींची Congress वर घणाघाती टीका | अजून ते सावरलेले नाहीत | Narendra Modi | News

Lokmat 2021-09-13

Views 0

पॅलेस्टाईन, संयुक्त अरब अमिरात आणि ओमानच्या दौ-यावर असलेल्या पंतप्रधान मोदी ह्यांनी अबुधाबीत भारतीय समुदायासमोर आपले मनोगत व्यक्त करताना मोदींनी जीएसटी, नोटाबंदी आणि इतर मुद्दय़ांवर आपले सरकार प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे. आपल्या सरकारने घेतलेले प्रत्येक निर्णय हे सामान्य माणसाच्या हिताचे होते आणि त्या निर्णयांच्या बाजूने सामान्य माणूस उभाही राहिला. मात्र विरोधक अजूनही नोटाबंदीचा धक्का पचवू शकले नसल्याचे म्हणत मोदींनी काँग्रेसला पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले.आपण जुने घर सोडून नवीन घरात रहायला गेलो की पहिले दिवस आपणही काहीसे चाचपडत फिरत असतो. कोणती गोष्ट नेमकी कुठे ठेवली आहे याचा आपल्याला पत्ता लागत नाही. भारतातही ७० वर्षांपासून सुरु असलेली व्यवस्था बदलण्यास थोडासा कालावधी जाईल, मात्र बदल नक्की घडून येतील, असे म्हणत मोदींनी आपल्या सरकारने केलेल्या कामांचा पाढा वाचला.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS