भारत आणि कॅनडा या दोन देशांमधील संबंध वेगाने वृद्धींगत होत आहेत. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो 17 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी अशा आठवड्याभराच्या दौ-यावर भारतात येत आहेत. या दौ-यादरम्यान ते नवी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, आग्रा, अमृतसर या शहरांना भेट देतील. जस्टीन ट्रुडो हे कॅनडाचे माजी पंतप्रधान पिएरे ट्रुडो यांचे पुत्र. त्यामुळे राजकारणाची आणि लिबरल पक्षाच्या धोरणांची माहिती त्यांना लहानपणापासूनच मिळत होती. त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षीच त्यांची आई मार्गारेट आणि वडील पिएरे विभक्त झाले. त्यानंतर कॅनडाच्या मॅकगील विद्यापीठ आणि युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबियामधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते फ्रेंच आणि गणित शिकविण्याचे काम केले होते .
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews