पश्चिम बंगालमध्ये रेल्वे रुळांपासून हत्तींना दूर ठेवण्यासाठी रेल्वेप्रशासनाने एक नामी शक्कल लढवली आहे. याठिकाणी हत्तींना पट्ट्यापासून दूर ठेवण्यासाठी रुळाला मधमाशांच्या घोंगावण्याचा आवाज काढणारे उपकरण लावण्यात येणार आहे. आसामच्या रांगिया भागात हा प्रयोग यशस्वी ठरल्या नंतर रेल्वेतर्फे पश्चिम बंगालच्या अलीपूरद्वार येथे हा प्रयोग करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत.मधमाशांच्या घोंगावण्याच्या आवाजा पासून हत्ती दूर राहतात, असा स्थानिक लोकांचाही अनुभव आहे. मधमाशांचा घोंगावण्याचा आवाज इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन घेवून तो एम्प्लिफायर वर वाजवला जातो. या आवाजाला घाबरुन हत्ती किमान ६०० मीटर दूर राहतात. ही उपकरणे क्रॉसिंगचे ठिकाण तसेच रेल्वेरुळाला लागून असलेल्या महत्वाच्या ठिकाणी लावण्यात येत आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews