देशातील लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आता नवा निर्णय घेतला आहे. कार्टून चॅनलवर आता जंक फुडच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली असून केंद्रीय सूचना आणि प्रसारण खात्याचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी संसदेत ही माहिती दिली. भारतीय अन्न सुरक्षा आणि दर्जा प्राधिकरणाने (एफएसएसआय) ११ सदस्यांची समिती नेमली होती. त्यांनी अभ्यास करुन शिफारसी केल्या आहेत. त्यांनी अॅडव्हर्टायजिंग स्टॅण्डर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया’शी (आस्की) एक करार केला आहे. यानुसार दिशाभूल करणारे आणि लहान मुलांना मर्यादेपेक्षा जास्त आकर्षित करणाऱ्या जाहिराती न दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोका-कोला, जनरल मिल्क, पेप्सी, फलेरो, केलॉक्स नॅस्ले, हिंदूस्तान लिव्हर अशा नऊ कंपन्यांनी स्वतःहून पुढाकार घेत अशा जाहिराती दाखवणार नाही
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews