[12:52 PM, 1/21/2018] Vinay Thikana: मागासवर्गीय समाजातील व्यक्तिशी लग्न केल्यानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळविणे बेकायदेशीर असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.या प्रकरणातील संबंधित महिला १९९३मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील केंद्रीय विद्यालयात पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. आता ती उपप्राचार्य पदावर कार्यरत होती. सर्वसाधारण प्रवर्गात मोडणाऱ्या अगरवाल कुटुंबात जन्मलेल्या या महिलेने १९९१ मध्ये बुंलंदशार जिल्हा दंडा धिकाऱ्यांमार्फत जात प्रमाणपत्र मिळविले होते. त्यानंतर शैक्षणिक पात्रता आणि जात प्रमाणपत्र यांच्या आधारावर तिने मागास वर्गीयांच्या कोट्यातून ही शिक्षिकेची नोकरी मिळविली होती. दरम्यान, संबंधित महिलेने बेकायदा आरक्षणाचा फायदा घेतल्याने दोन दशकांच्या तिच्या सेवेनंतर तिची चौकशी होऊन २०१५मध्ये संबंधित विभागाने तिचे जात प्रमाणपत्र रद्द ठरवले होते. त्यानंतर या विरोधात तिने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु न्यायालयाने तिच्या बडतर्फीचे समर्थन केले होते. त्यानंतर या महिलेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, आता इथेही न्यायालयाने तिची याचिका फेटाळून लावली आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews