क्षेपणास्र् डागण्यावरून सध्या अनेक देश एकमेकांना धमकावत असताना, एका अफवेने अमेरिकेत सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. अमेरिकेतील प्रमुख राज्य असणा-या हवाईत क्षेपणास्र् डागल्याचा मेसेज मोबाईल वर चुकून पाठवण्यात आला आणि क्षणातच सर्वत्र भीतेचे सावट पसरले.हवाईतील नागरिकांच्या मोबाईलवर सकाळी ८ च्या दरम्यान एक आपत्कालीन मेसेज आला. ‘अमेरिकेतील हवाई भागाच्या दिशेने बॅलिस्टिक मिसाईल येण्याची भीती आहे. तातडीने योग्य ठिकाणी आश्रय घ्या. ही कोणतीही ड्रील नाही.’ असे त्यात म्हटले होते.असे मेसेजमध्ये लिहिण्यात आल्याने नागरिकांचा अधिक थरकाप उडाला; परंतु काही वेळातच अधिका-यांनी स्पष्ट केले की, चुकून बटन दाबले गेल्याने अशाप्रकारचा मेसेज गेला आहे. तसेच हवाईतील आपत्कालीन यंत्रणेने ट्विट करून हवाई परिसरात कोणताही धोका नाही असे जाहीर केले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews