उत्तर प्रदेशातील भाजप खासदार रेखा वर्मा आणि भाजप आमदार शशांक त्रिवेदी यांच्यात ब्लँकेट वाटपाच्या श्रेयवादा वरुन तुंबळ शाब्दिक बाचाबाची झाली. दोन्ही कडील समर्थक आक्रमक झाले आणि हा वाद इतका वाढला की, खासदार रेखा वर्मा यांनी आमदारावर थेट चप्पलच उगारली.त्यानंतर दोन्ही कडील समर्थकांमध्ये धक्का बुक्कीही झाली. काहींनी तर टेबलही फेकले. खासदार आणि आमदारांचे समर्थक हातापायवरही आले आणि प्रकार मारहाणीपर्यंत पोहाचला.पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनी या सर्व प्रकारात हस्तक्षेप करत सर्वांना शांत केले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews