आदर्श घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलासा दिला असताना पुन्हा एकदा अशोक चव्हाण अडचणीत आले आहेत. आदर्श घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 22 डिसेंबरला उच्च न्यायालयाने कोट्यवधी रुपयांच्या आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण यांची चौकशी करण्यास व खटला चालविण्यास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली मंजुरी रद्द ठरविली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews