पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला होता. तर काही दिवसांपूर्वी पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यात मेजर प्रफुल्ल मोहरकरही शहीद झाले होते. याचाच बदला आज बीएसएफनं घेतला. बीएसएफच्या जवानांनी आज तब्बल 12 पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातलं. बीएसएफ जवान राधापद हाजरा यांना काल त्यांच्या वाढदिवशीच वीरमरण आलं होतं. याचाच बदला बीएसएफच्या जवानांनी घेतला.बीएसएफच्या जवानांनी पाकिस्तानच्या तीन मोर्टार रेंज आणि पाकिस्तानच्या चौक्याही उद्ध्वस्त केल्या आहेत. भारताच्या या थेट कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्याला बरंच नुकसान झालं आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews