इंडियन प्रीमियर लीग नव्या मोसमासाठी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. सर्व आयपीएल संघांनी आपापली रिटेंशन यादी सादर केली आहे. चेन्नई सुपर किंग्जने कर्णधार महेंद्रसिंह धोनी, रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैनाला कायम केलं आहे. तर मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमरा यांना कायम केलं.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु - कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि सरफराज अहमदला रिटेन केलं. चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्र सिंह धोनी, रवींद्र जाडेजा आणि सुरेश रैना.दिल्ली डेअरडेव्हिल्स – ऑलराऊंडर ख्रिस मॉरिस, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर.कोलकाता नाईट रायडर्स ने कर्णधार गौतम गंभीरला सोडलं आहे. सुनील नारायण आणि आंद्रे रसलला कायम केलं आहे.
राजस्थान रॉयल्स – स्टीव्ह स्मिथ.सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार.किंग्ज इलेव्हन पंजाब – अक्षर पटेल.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews