मरोळ भागातील चर्चरोड शिवाजी नगर भागात असलेल्या बाहेरी कॉलनी तील मैमून मॅन्शन इमारती च्या तिसऱ्या मजल्यावर रहात असलेल्या कापसी कुटुंबा तील चौघांचा मृत्यू झाला आहे. तर कापसी कुटुंबाच्या वरच्या बाजूला राहणाऱ्या कोठारी कुटुंबा तील ७ जण जखमी झाली आहेत. या दुर्घटनेमुळे या परिसरातील सगळे जण हादरले आहेत.या आगीमध्ये तसनीम कापसी , सकीना कापसी, मोईज कापसी आणि त्यांचे आजोबा या सगळ्यांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हे कुटुंब बचावासाठी खिडकीत उभं राहून ओरडत होतं, मात्र आग प्रचंड असल्याने त्यांना वाचवण्यासाठी कोणीच आत जाऊ शकलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत हे चौघेही जण गंभीररित्या भाजले होते, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. रात्री बारा साडेबाराच्या आसपास शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असावी असा संशय आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews