बिहारच्या मुंगेर जिल्हाधिकारी कार्यालयातील चालक संपत राम यास निवृत्तीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: कार चालवत त्याच्या घरी नेऊन सोडले. चालक मंगतराम यासही डोळ्यावर विश्वास बसला नाही. ज्योतीनगरमध्ये आल्यानंतर घरासमोर मंगतराम जेव्हा गाडीतून खाली उतरला आणि त्याच्या पत्नी व मुलांनी हे दृश्य पाहिले तेव्हा त्यांच्याही डोळ्यात पाणी आले.निरोपाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी संपतरामसाठी कारचा दरवाजा स्वत: उघडला आणि त्याला गाडीत बसवले.संपतराम म्हणाला, जिल्हाधिकारी स्वत: कार चालवत मला घरी नेतील, असे स्वप्नातही वाटले नव्हते. मी सेवानिवृत्त होत आहे, याची कल्पना होती. निरोप समारंभ होईल व असा सन्मान मिळेल, असे स्वप्नातही वाटले नव्हते.जिल्हाधिकारी साहेब म्हणाले, गाडीकडे चल. तेव्हा मी माझ्या जागेवर बसण्यासाठी कारचा दरवाजा उघडत होतो. तेव्हा साहेब म्हणाले, आज कार मी चालवणार आहे. तू माझ्या जागेवर जाऊन बस. मला काही कळलेच नाही. यापूर्वी साहेबांना कधीच कार चालवताना आम्ही पाहिले नव्हते. मी साहेबांच्या हातात किल्ली दिली आणि साहेबांनी माझ्यासाठी मागचा दरवाजा स्वत: उघडला. आजचा प्रसंग पाहताना माझ्या डोळ्यात पाणी आले.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews