हेरगिरी आणि घातपाती कारवायांप्रकरणी पाकिस्तान ने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. सध्या जाधव हे पाकच्या कैदेत असून सोमवारी जाधव यांच्या पत्नी आणि आईने त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांचा वैद्यकीय अहवाल जाहीर केला होता. या अहवालात कुलभूषण जाधव यांची प्रकृती उत्तम असल्याचे म्हटले होते. दुबईतील रुग्णालयाने हा अहवाल दिल्याचे पाकने म्हटले आहे.या संदर्भात दुबईतील रुग्णालयाशी संपर्क साधला. त्यांनी कुलभूषण जाधव नामक रुग्ण आमच्या रेकॉर्डवर नाही, असे सांगितले. त्यामुळे पाकिस्तान च्या अहवालावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाकिस्तानने दिलेल्या अहवालावर तारीख हाताने लिहीलेली आहे. तसेच या पेपरवर मेडिकल रिपोर्ट नंबर नव्हता, अशी माहिती देखील समोर आली आहे. अहवाला बाबत वेगवेगळे दावे समोर येत आहे. दुबईतून संबंधित डॉक्टरला विमानाने पाकिस्तानला नेण्यात आले. मात्र, या डॉक्टरला कोणाची तपासणी करायची आहे, रुग्णाचे नाव काय याबाबत कोणतीही माहिती नव्हती, असे देखील वृत्त आहे. जवळपास तासभर डॉक्टरांनी कुलभूषण जाधव यांची तपासणी केली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews