‘ती’ बैठक Mani Shankar Aiyar यांच्या घरी झाली, माजी लष्करप्रमुखांचा खुलासा | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 0

काँग्रेसचे निलंबित नेते मणिशंकर अय्यर यांच्या घरी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली होती, या पंतप्रधान मोदी यांच्या आरोपांना माजी लष्कर प्रमुख दीपक कपूर यांनी दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे या  बैठकीस आपण उपस्थित होतो, असे सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्पष्ट केले आहे.
दीपक कपूर म्हणाले, पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी हे भारत दौर्‍यावर आले, त्यावेळी अय्यर यांच्या घरी एक बैठक झाली होती. बैठकीस तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह उपस्थित होते. अय्यर यांनी कसुरी यांना स्नेहभोजनाचे निमंत्रण दिले होते. या पार्श्‍वभूमीवर ही बैठक झाली होती. त्या बैठकीस मीही उपस्थित होतो. या बैठकी केवळ भारत-पाक संबंधावर चर्चा झाली होती. आणखी कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही, असे दीपक कपूर यांनी सांगितले.
दीपक कपूर हे 2010 मध्ये लष्कर प्रमुख पदावरुन निवृत्‍त झाले होते. कपूर यांनी दिलेल्या या माहितीमुळे काँग्रेस तोंडघशी पडली आहे. कारण काँग्रेसने यापूर्वी अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे म्हटले होते.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS