Uddhav Thackeray यांनी पंतप्रधान Narendra Modi वर सोडले टीकास्त्र | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 1

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत पाकड्यांचा हात व जीभ वळवळत असेल तर फक्त प्रचार सभांतून आरोपांचा धुरळा न उडवता पंतप्रधानांनी या वळवळणाऱ्या जिभा व हात कलम करण्याची हिंमत दाखवायला हवी. पायाखालची वाळू सरकली की पाकिस्‍तान व दाऊदची जपमाळ ओढायची हा नापाकपणाच. मोदी यांच्याकडून देशाला कृतीची अपेक्षा आहे. पाकड्यांची जपमाळ किती ओढाल?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍यावर टीका केली आहे. गुजरात निवडणुकीत पाकिस्‍तान काँग्रेसच्‍या मदतीने आपल्‍याविरोधात कटकारस्‍थान रचत असल्‍याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभांमध्‍ये केला आहे. त्‍यावरुन उद्धव ठाकरे यांनी 'पंतप्रधानांनी आरोप करायचे नसतात, कृती करायची असते', असे सुनावले आहे


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS