विराट कोहलीच्या अनुपस्थितीत श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्त्व करणाऱ्या रोहित शर्माने बुधवारी नवा इतिहास रचला. त्याने 153 चेंडूत नाबाद 208 धावांची खेळी साकारली. त्यामुळे एकदिवसीय प्रकारात तीन द्विशतके झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. रोहितच्या या सुवर्ण कामगिरीला एक योगायोग जुळून आल्यामुळे आणखी झळाळी लाभली. रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितिका यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. त्यामुळे रोहितची आजची अविस्मरणीय खेळी रितिकासाठी खास भेट ठरली. रोहित शर्माने द्विशतक झळकावल्यानंतर ‘वेडिंग रिंग’च्या बोटाचे चुंबन घेऊन रितिकाला फ्लाईंग किसही दिला. यावेळी सर्व कॅमेरे रोहित शर्मा आणि रितिका यांच्यावर खिळले होते. त्यामुळे आता सोशल मीडियावर ‘विरुष्का’नंतर रोहित आणि रितिका दोघेही चर्चेचा विषय ठरत आहेत.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews