हल्लीच्या जमान्यात जिथे माणसे एकमेकांच्या मदतीसाठी धावून जात नाहीत, तेथे मुक्या प्राण्यांसाठी एखाद्याने स्वत:चा जीव धोक्यात घालणे म्हणजे दुर्मिळ घटना म्हणायला हवी.मानवी जगात अजूनही थोडीफार भूतदया शिल्लक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.दक्षिण कॅलिफोर्निया तील जंगलांमध्ये काही दिवसांपूर्वी वणवा पेटला होता. अन् एका तरुणानं आगीच्या दिशेनं धाव घेतली. तो नेमकं काय करत होता याचं आकलन अनेकांना होत नव्हतं. पण, थोड्यावेळाने सारा प्रकार तिथून जात असलेल्या लोकांच्या लक्षात आला. या ठिकाणी वणव्यामुळे भेदरलेला ससा सैरावैरा पळत होता. तो जंगलाच्या दिशेनं पळाला असता तर नक्कीच त्याचा होरपळून मृत्यू झाला असता. बऱ्याच प्रयत्नानंतर तरूणाने या सशाची आगींच्या झळांपासून सुटका केली आणि त्याला आगीतून सुरक्षितपणे बाहेर काढले. आणि सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews