डॉक्टर दाम्पत्य केले हृदयस्पर्शी काम | व्हिडिओ पाहून व्हाल थक्क | Lokamt News

Lokmat 2021-09-13

Views 0

एका अपघाताने अमरावती च्या डॉक्टर सावरकर दाम्पत्या वर दु:ख कोसळले आहे. त्यांची अवघ्या तीन महिन्यांची मुलगी या अपघातात गंभीर जखमी झाली. डॉक्टरांनी तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले. पण ती उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने व्हेंटिलेटरवर असून तिला ब्रेनडेड घोषित केले आहे. दु:खद प्रसंगीही हे दाम्पत्य न खचता त्यांनी आपल्या लाडकीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आहे. अवयवदाना संबंधी असलेले नियम शिथिल करून अवयवदानाची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी सरकारकडे केली आहे.डॉ. उमेश आणि अश्विनी सावरकर असे या डॉक्टर दाम्पत्याचे नाव आहे. ते दोघेही रविवारी डॉक्टरांची वार्षिक बैठक आटोपून घरी परतत असता एका भरधाव कारने त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात उमेश थोडक्यात बचावले असले तरी पत्नी अश्विनी आणि तीन महिन्यां ची मुलगी मीरा या दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दु:खाचे डोंगर कोसळूनही हे दाम्पत्य खचलेले नाही. तिचे अवयव दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. मीरा हे आमचे पहिले अपत्य आहे. त्यामुळे ते सदैव आमच्यासाठी विशेष असेल. जे झाले ते दुर्दैवी आहे. अवयवदान करून एखाद्या बाळाच्या रूपाने तिला जिवंत ठेवायचे आहे, अशा भावना सावरकर दाम्पत्याने व्यक्त केल्या.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS