शहरात गेल्या काही दिवसांपासून रिचार्ज अॅपवरून अनेकांची मोठी फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. एक चाळीशी च्या आसपासची व्यक्ती आणि मुलगी हे दोघे मिळून हा प्रकार करत असल्याचे उघड झाले असून, ही 'बंटी-बबली'ची जोडी पोलिसां साठीही आव्हान ठरत आहे. याबाबत राजवाडा पोलिसांत फिर्याद दिली. शहरात वितरक नेमणार असल्याचे सांगत राजेश मेनन व अंजली सावळे या दोघांनी अनेकांना गळ घातला. संशयित सागर साळोखे यांच्या दुकानात आले. अॅप किंग नावाचे नवे अॅप बाजारात आले असून, यातून रिचार्ज केल्यास दुकानदाराला 4 टक्के तर वितरकाला 7 टक्के कमिशन मिळणार असल्याचे सांगितले. शिवाय मेनन याने साळोखेंना 1 हजार रुपयांच्या बदल्यात तत्काळ १ हजार 40 रुपयांचा बॅलन्स उपलब्ध करून दिला. शिवाय सचिन बिरंजे यांच्याकडूनही दोघांनी 50 हजार रुपये घेतले तर साळोखेंकडून 60 हजार रुपये घेतले. दुपारी कंपनीचे अधिकारी मार्केटला येणार असून दोघेही मार्केटला फिरून येतो असे सांगून निघून गेले. गुरुवारी दुपारी परिसरातील काही दुकान दारांनी घेतलेल्या किंग अॅपवरील बॅलन्स रिफंड झाला. याची माहिती मिळताच दहा ते पंधरा दुकानदार एकत्र आले. सर्वांनी मेनन व अंजली सावळे यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण दोघांचे मोबाईल बंद होते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews