आपल्यापासून 111 प्रकाशवर्षे अंतरावर असलेला ग्रह पृथ्वी सारखाच असून तेथे सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. के 2 18 बी हे या ग्रहाचे नाव असून तो महापृथ्वी म्हणून ओळखता येईल इतका पृथ्वीसदृश आहे. तेथे सजीवसृष्टीस पोषक स्थिती असल्याचे सांगण्यात आले. या ग्रहाचा पृष्ठभाग पृथ्वीसारखाच खडकाळ आहे.कॅनडातील टोरांटो विद्यापीठाच्या संशोधकांनी या ग्रहाचा शोध लावला असून तो ‘के 2-18 ’ या लाल बटू ताऱ्याभोवती फिरत आहे. के 2-18 बी हा ग्रह विलक्षण आहे व त्याचा शोध उत्कंठा वाढवणारा आहे. 2015 मध्ये या ग्रहाचा शोध लागला होता . अजून काही घटकांच्या आधारे त्याची पृथ्वीसदृश ग्रह म्हणून तपासणी करणे बाकी आहे. .हाय अॅक्युरसी रॅडिअर व्हेलॉसिटी सर्चरच्या मदतीने या ग्रहाचे वस्तुमान व वेग मोजला जाणार आहे, पण त्याआधी यांत्रिक आकलन पद्धतीने हा ग्रह पृथ्वीसारखाच किंवा त्यापेक्षा जीवसृष्टीस अधिक लायक असल्याचे सांगण्यात आले. त्याचे वातावरण पृथ्वीसारखेच आहे व तेथे द्रव रूपात पाणी व बर्फोचेही अस्तित्व असावे असा अंदाज आहे. या ग्रहापासून दर 33 दिवसांनी व 39 दिवसांनी वेगवेगळे संदेश मिळत होते. त्याच्या आधारे क्लॉटियर या विद्यार्थ्यांस त्यात वेगळी वैशिष्टय़े जाणवली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews