राजस्थानमधील भरतपूरमध्ये असा हास्यास्पद प्रकार घडला आहे, आणि या प्रकारचा निषेध करण्यासाठी 23 वर्षांच्या तरुणानं वेगळा मार्ग अवलंबला. हा तरूण नेहमीच आपली कार चालवताना डोक्यावर हेल्मेट घालूनच चालवतो. विष्णू शर्मा असं त्याचं नाव आहे. एक डिसेंबरला आपल्या घरी परतत असताना आग्रा जयपूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडून 200 रुपयांचा दंड आकाराला. त्यावेळी विष्णू आपली ओमिनी कारमधून घरी परतत होते. माझ्याकडे वाहतूक परवाना आणि इतर महत्त्वाचे दस्ताऐवज होते. इतकंच नाही तर मी सीट बेल्टदेखील लावला होता. तरी हेल्मेट घातले नसल्याचे सांगत माझ्याकडून 200 रूपयांचा दंड आकारण्यात आला. ‘चारचाकी चालवताना कोण हेल्मेट घालतं?’ हा प्रश्न मला पडला. पण पोलीस काही ऐकायला तयार नव्हते. मला पुन्हा दंडाची रक्कम भरायची नाही. म्हणून मी नेहमीच हेल्मेट घालून चारचाकी चालवतो आणि माझा निषेध व्यक्त करतो असं तो म्हणाला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews