सकाळी 6.57 वाजल्या पासून दुपारी 3.55 पर्यंत इंद्रधनुष्यातील सप्तरंगांची उधळण पहायला मिळाली. पाऊस पडल्यानंतर आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहायला मिळतो. निसर्गाची ही सुंदर निर्मिती पावसानंतर पाहायला मिळण्यासारखा सुंदर अनुभव दुसरा कोणताही नसेल. पण, मेख अशी असते की, अनेकदा काही सेकंदासाठी किंवा मिनिटभरासाठी इंद्रधनुष्य आकाशात दिसतो आणि नाहीसा होतो. पण, तैवानमध्ये थोडाथोडका नाही तर तब्बल 9 तासांहून अधिक काळ आकाशात इंद्रधनुष्य पहायला मिळाला.तायपिय पर्वतावर सकाळी 6.57 वाजल्या पासून दुपारी 3.55 पर्यंत इंद्रधनुष्यातील सप्तरंगांची उधळण पहायला मिळाली. हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. या इंद्रधन्युष्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक काळ आकाशात दिसलेला इंद्रधनुष्य म्हणून याची नोंद होऊ शकते.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews