राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी परीक्षांचे जाहीर केलेले वेळापत्रक कायम राहणार आहे. दहावीच्या द्वितीय सत्रातील नविन व्यवसाय विषयांची परीक्षा दि.5 मार्चला द्वितीय सत्र ऐवजी दि. 17 मार्च रोजी प्रथम सत्रात होणार आहे. हा अपवाद वगळता वेळापत्रकात बदल नाही. मंडळाने या वेळापत्रकावर लोकप्रतिनिधी, पालक, शक्षिक, संघटना आणि विद्यार्थी यांच्याकडून आलेल्या तक्रारी आणि सूचनांच्या आधारे हा निर्णय घेतला आहे.राज्य मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक एक वर्ष अगोदर जाहीर केले जाते. या वेळापत्रकावर लोकप्रतिनिधी, पालक, शक्षिक, संघटना आणि विद्यार्थ्यांसाठी 15 दिवसाच्या आत अभिप्राय मागविले जातात. त्याआधारे तारखेत बदल केला जातो. गतवर्षी संघटनांच्या हरकतींचा विचार करून बदल करण्यात आला होता. मात्र, यंदा वेळापत्रक कायम ठेवण्याचा नर्णिय मंडळाने घेतला आहे. काही दिवसांपुर्वी मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च तर दहावीची परीक्षा 1 मार्च ते 24 मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेचं वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं असलं, तरी छापील स्वरुपात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयां मध्ये पाठवण्यात येणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews