अनेकजणांना फिल्मस्टारसारखं दिसण्याची हौस असते. त्यांच्यासारखं दिसावं, तशी स्टाईल फॉलो करावी यासाठी अनेकजण प्रयत्न करतात.
हॉलिवूड स्टार अँजेलिना जोलीसारखं दिसण्यासाठी या मुलीनं ५० हून अधिक सर्जरी केल्या आहेत. इतक्या सर्जरी करून ती काही अँजेलिनासारखी दिसलीच नाही, पण तिचा चेहरा मात्र विद्रुप झाला आहे. ‘डेली मेल’नं दिलेल्या माहितीनुसार तिचं नाव सहार तबार आहे. ती १९ वर्षांची आहे. अँजेलिना जोलीची ती चाहती आहे, म्हणूनच तिच्यासारखं दिसण्यासाठी तिने लाखो रुपये खर्च केल्याचं समजत आहे.पण काहींच्या मते तिचं हे रुप सर्जरीचा परिणाम नसून मेकअपची कमाल असल्याचं म्हटलं जात आहे. आता खरं खोटं माहिती नाही पण, ही १९ वर्षांची सहार चांगलीच चर्चेत आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews