भाजपचे खासदार वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधून भाजपचे खासदार असलेल्या वरुण गांधींनी याबद्दल अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र गांधी घराण्यातील सर्व सदस्य लवकरच एकत्र येतील आणि हे 2019 च्या निवडणुकी आधी घडेल, असे वृत्त हाती आले आहे. 35 वर्षांनी गांधी कुटुंब एकत्र येणार असून यामध्ये प्रियांका गांधी यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. भाजप खासदार वरुण गांधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे चुलत बंधू आहेत. संजय गांधी यांचे सुपुत्र असलेल्या वरुण गांधी यांना भाजपमध्ये फारसे महत्त्व दिले जात नाही.वरुण गांधी यांनी अनेकदा पक्षाच्या आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. मात्र वरुण गांधी यांची आई मनेका गांधी या मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. वरुण गांधी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कधीही उघडपणे टीका केलेली नाही. त्यामुळे वरुण गांधी काँग्रेसवासी होऊ शकतात.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews