बॉलीवूड चा किंग्स ऑफ रोमान्स म्हटला जाणारा शाहरुख खानचा सध्या स्थितीत कोणताही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली कमाल दाखवू शकलेला नाही आणि सुपर फ्लॉप होत आहे. ज्यामुळे शाहरुख खान सुद्धा चिंतेत आहे. त्यात शाहरुख पुन्हा छोट्या पडद्यावर आगमन करेल अशी चर्चा होत होती. ती आता सत्य होत आहे. होय आता लवकरच शाहरुख खान आपल्या चाहत्यांसमोर छोट्या पडद्याच्या सहाय्याने येणार आहे. शाहरुख खान “टीईडी टॉक इंडिया नई सोच” ह्या शो मधून जबरदस्त एन्ट्री घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच ह्या शो चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ह्यात शाहरुख वेगळ्या दिमाखात दिसणार आहे. ह्या शो चे शाहरुख सूत्रसंचालन करणार आहे. हा शो 7 डिसेंबर पासून ऑन इयर होणार आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews