गुजरात निवडणुकीचे वातावरण तापले | Gujarat Legislative Assembly Election 2017 | Lokmat News

Lokmat 2021-09-13

Views 0

गुजरात निधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खऱ्या अर्थानं रंग चढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या होमपीचवर प्रचारासाठी दाखल होत झाले आहेत. सकाळीच भुजमधील सुप्रसिद्ध आशापुरा मंदिरात त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर सुरक्षेच कवच सोडून त्यांनी आलेल्या भविकांशी हस्तांदोलन केलं. 
आज दिवसभर मोदींच्या चार सभा होणार आहेत. त्यापैकी पहिली सभा भुजमध्ये, दुसरी राजकोटमध्ये, तिसरी अलमेरीत तर शेवटी सुरत जवळच्या कडोदऱ्यात होतेय. सगळ्याच ठिकाणी मोदींच्या सभेसाठी जय्यत तयारी सुरू आहे. राहुल गांधींनी दोन महिन्यात ४ दौरे करून प्रचारात आघाडी घेतली आहे. आता त्याला उत्तर देण्यासाठी मोदी रिंगणात उतरत आहेत. सोबत केंद्रातले जवळपास सगळे वडे मंत्री, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री अशी तगडी फौज गुजरातच्या रणसंग्रमात भाजपनं आजपासून सक्रीय केली आहे. मोदींच्या आगमनापूर्वीच कालपासून राज्याच्या विविध भागांमध्ये भाजप नेत्यांनी बूथनिहाय रॅली आयोजित केल्या आहेत. तसंच पहिल्या टप्प्यातील 89 विधानसभा मतदारसंघांच्या बूथवरील कार्यकर्त्यांसाठी चाय पे चर्चाचंही आयोजन केलं आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS