अभिनेत्री सनी लिओनीने सेटवरील धमालमस्तीचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर शेअर केला होता. चित्रपटाच्या टीममधील एकाने केलेल्या प्रँकचा हा व्हिडिओ होता. सनी स्क्रिप्ट वाचत बसलेली असतानाच टीममधील एका सदस्याने तिच्याजवळ साप आणला, पाठमोऱ्या सनीला याची पुसटशी कल्पनाही नव्हती. जेव्हा त्याने तो साप तिच्या अंगावर सोडला तेव्हा मात्र ती घाबरून धूम ठोकून पळाली. त्यावेळी सेटवर एकच हशा पिकल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळालं. या प्रँकचा बदला घेतल्याशिवाय सनी शांत बसणार नव्हती. बदला घेतानाचा व्हिडिओसुद्धा तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.या व्हिडिओमध्ये तिने दोन्ही हातात केक घेतला आहे. तिच्यावर साप सोडणाऱ्या व्यक्तीच्या मागून हळूच येऊन त्याच्या दोन्ही गालांवर केक लावून पळून जाते. ‘हा आहे माझा बदला…माझ्याशी केलेली मस्करी तुम्हाला महागात पडू शकते,’ असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews