एखाद्या माणसावरून एखादी भलीमोठी मालगाडी धडधडत गेली, तर तो जगण्याची शक्यता कमीच. पण उत्तर प्रदेशात एका माणसाच्या अंगावरून मालगाडी गेली तरी त्याला खरचटले देखील नाही.
ही घटना 15 नोव्हेंबरला बनकटा रेल्वे स्थानकावर घडली. या इसमास ट्रेन पकडायची घाई होती, म्हणून तो पादचारी पुलाऐवजी ट्रॅक ओलांडत होता. ट्रॅकवर एक मालगाडी आधीच उभी होती. त्या गाडीखालून वाकून हा पठ्ठ्या ट्रॅक क्रॉस करत होता. तेवढ्यात गाडी सुरू झाली. आता मेलो, म्हणत, दुसरं काही सुचेना म्हणून तो तिथेच आडवा झोपला. ट्रेन त्याच्या अंगावरून गेली, तरी तो वाचला!
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews